Vanrakshak Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभागातर्फे लवकरच १२,९९१ वनरक्षक (वन सेवक) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहेत. या भरतीची घोषणा राज्य शासनाने एका जीआर (Government Resolution) द्वारे केली असून, १२ वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी आतापासूनच तयारी सुरू करणे आवश्यक आहेत.
Vanrakshak Bharti 2025
भरतीचे मुद्दे (Maharashtra Vanrakshak Bharti 2025)
भरतीचे नाव | महाराष्ट्र वन विभाग भरती २०२५ |
विभागाचे नाव | महाराष्ट्र वन विभाग |
पदाचे नाव | वनरक्षक / वन सेवक |
एकूण जागा | १२,९९१ |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | लवकरच जाहीर होईल |
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि पात्रता निकष ठरवण्यात आले आहेत:
- शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी किमान १०वी आणि १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा: अर्जदाराचे वय जास्तीत जास्त ५० वर्षांपर्यंत असावे.
- वेतन: निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा अंदाजे २८,०९० रुपये वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची पद्धत
या पदांसाठीची निवड प्रक्रिया दोन मुख्य टप्प्यांमध्ये होईल:
१. ऑनलाईन परीक्षा: उमेदवारांना ऑनलाईन लेखी परीक्षा द्यावी लागेल. २. शारीरिक चाचणी: लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाईल.
इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरतीची सविस्तर जाहिरात जाहीर झाली असली तरी, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक अजून सुरू झालेली नाही. त्यामुळे, उमेदवारांनी शारीरिक चाचणी आणि ऑनलाईन परीक्षेची तयारी आतापासूनच सुरू करावीत.
राज्यातील नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे आणि इतर जिल्ह्यांमध्ये या १२,९९१ पदांची भरती केली जाणार आहेत. १०वी आणि १२वी पास महिला आणि पुरुषांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे. अधिकृत अर्ज लिंक सुरू झाल्यावर तुम्हाला त्याची माहिती मिळेल, त्यामुळे नियमितपणे सरकारी संकेतस्थळांना भेट देत राहा.