शेतकऱ्यांना वर्षाला 36,000 रुपये पेन्शन मिळणार; सर्वात मोठी घोषणा! PM Kisan Mandhan Pension Yojana

PM Kisan Mandhan Pension Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो! जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे! आता तुम्हाला सरकारकडून आणखी एका मोठ्या योजनेचा लाभ मिळू शकतो. ही योजना म्हणजे पंतप्रधान किसान मानधन पेन्शन योजना (PM Kisan Mandhan Pension Scheme). या योजनेमुळे, तुम्हाला उतारवयात दरमहा ३,००० रुपये, म्हणजेच वार्षिक ३६,००० रुपये पेन्शन मिळू शकतात. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, यासाठी तुम्हाला खिशातून एक रुपयाही भरण्याची गरज नाहीत!

पेन्शन कशी मिळेल?

पंतप्रधान किसान योजनेशी संबंधित १८ ते ४० वयोगटातील शेतकरी या पेन्शन योजनेत नोंदणी करू शकतात. तुम्ही ६० वर्षांचे झाल्यावर तुम्हाला दरमहा ३,००० रुपये पेन्शन मिळायला सुरुवात होईल.

२६ लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार, तुम्ही पात्र कि अपात्र? यादी चेक करा Ladki Bahin Yojana
२६ लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार, तुम्ही पात्र कि अपात्र? यादी चेक करा Ladki Bahin Yojana Qualification Status

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या पेन्शन योजनेसाठी लागणारे पैसे तुमच्या पीएम किसान योजनेतून मिळणाऱ्या वार्षिक ६,००० रुपयांमधूनच थेट कापले जातील.

उदाहरणार्थ: जर तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षी दरमहा २०० रुपये योगदान निवडले, तर तुमच्या ६,००० रुपयांमधून दरवर्षी २४०० रुपये कापले जातील आणि उरलेले ३६०० रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील. यामुळे तुमच्या खिशातून एकही पैसा जाणार नाही, तरीही तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळेल.

बांधकाम कामगारांना 12,000 रुपये; तुम्ही पात्र आहात का? चेक करा Bandhkam Kamgar Yojana List
बांधकाम कामगारांना 12,000 रुपये; तुम्ही पात्र आहात का? चेक करा Bandhkam Kamgar Yojana List

नोंदणी कशी करावी?

या योजनेत नोंदणी करणे खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त काही गोष्टींची तयारी करायची आहे:

  1. जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात (CSC) जा.
  2. तुमच्यासोबत आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीची कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो घेऊन जा.
  3. CSC ऑपरेटर तुमच्या माहितीनुसार ऑनलाइन फॉर्म भरेल आणि ऑटो-डेबिट फॉर्मही भरेल, ज्यामुळे मासिक योगदान तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापले जाईल.
  4. नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक युनिक पेन्शन आयडी नंबर मिळेल. हा नंबर जपून ठेवा, कारण तो भविष्यात तुमच्या कामाला येईल.

पीएम किसानचा २० वा हप्ता आला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच २ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरातील ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा २० वा हप्ता जमा केला आहे. जर तुम्ही पीएम किसानचे लाभार्थी असूनही तुम्हाला हप्ता मिळाला नसेल, तर तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुमचे नाव तपासू शकता आणि आवश्यक माहिती अपडेट करू शकता.

इंडियन नेव्ही मेगाभरती 1315 जागा 10 वी पास सरकारी नोकरी पगार 63 हजार रु Indian Navy Bharti 2025
इंडियन नेव्ही मेगाभरती 1315 जागा 10 वी पास सरकारी नोकरी पगार 63 हजार रु Indian Navy Bharti 2025

या पेन्शन योजनेचा लाभ घेऊन तुमचे उतारवयाचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करा!

Leave a Comment