MahaDBT Lottery List: कृषी यांत्रिकीकरणाची नवीन सोडत यादी जाहीर, तुमचे नाव चेक करा

MahaDBT Lottery List: शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची तसेच ज्ञआनंदाची बातमी आहे! महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलद्वारे कृषी यांत्रिकीकरण घटकाची सोडत यादी १ ऑगस्ट २०२५ रोजी काढण्यात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची या यादीमध्ये निवड झाली आहे, त्यांना आता त्यांची आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करून घ्यावी लागणार आहे. यासाठी राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे आणि पुढील प्रक्रिया

या यादीत निवड झालेल्या लाभार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील:

  • फार्मर आयडी
  • सातबारा उतारा
  • होल्डिंग (Holding)
  • निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन (Quotation)
  • टेस्ट रिपोर्ट (Test Report)
  • जर ट्रॅक्टरचलित अवजारे असतील, तर निवड झालेल्या व्यक्तीचे आरसी बुक (RC Book)

ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, पूर्वसंमती दिली जाईल आणि त्यानंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे

महत्त्वाची अट

ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या नावावर ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे. जर ट्रॅक्टर निवड झालेल्या व्यक्तीच्या नावावर नसेल, तर तो कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असणे गरजेचे आहे. यामध्ये आई, वडील आणि त्यांचे अविवाहित अपत्य यांचा समावेश होतो.

जिल्हानिहाय निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या

या लॉटरी यादीमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे:

  • बुलढाणा: १,४६५
  • सोलापूर: ८६६
  • लातूर: ८१८
  • अहिल्यानगर: ७९६
  • जळगाव: ६२०
  • सांगली: ६०९
  • नाशिक: ४५८
  • परभणी: ४५५
  • जालना: ३८५
  • सिंधुदुर्ग: ३२४
  • धुळे: ३१७
  • यवतमाळ: ३१४
  • भंडारा: २९०
  • पुणे: १६९
  • नांदेड: २६२
  • सातारा: २३३
  • चंद्रपूर: २२६
  • गोंदिया: २१६
  • हिंगोली: १५२
  • वर्धा: १५१
  • धाराशिव: १२७
  • बीड: १८९
  • कोल्हापूर: ८५
  • नागपूर: ८४
  • छत्रपती संभाजी नगर: ५४
  • पालघर: ५०
  • रायगड: ४२
  • ठाणे: ३९
  • नंदुरबार: ३५
  • अमरावती: २५
  • वाशिम: २१
  • अकोला: १७
  • रत्नागिरी: १२
  • गडचिरोली: ०१

ज्या शेतकऱ्यांची या यादीमध्ये निवड झाली आहे, त्यांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून या योजनेचा लाभ घ्यावा.

Leave a Comment