ST Mahamandal Bharti 2025: मित्रांनो, तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहेत! महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने (MSRTC) प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती नाशिक येथे होणार असून, एकूण ३६७ जागांसाठी आहेत. दहावी पास उमेदवारांपासून ते इंजिनियरपर्यंत सर्वांसाठी ही एक उत्तम संधी आली आहे. चला, या भरतीबद्दल सविस्तर माहिती पाहूयात.
ST Mahamandal Bharti 2025
भरतीची महची माहिती
- भरतीचे नाव: एसटी महामंडळ भरती २०२५
- पदांचे स्वरूप: प्रशिक्षणार्थी (Apprentice)
- नोकरीचे ठिकाण: नाशिक
- एकूण जागा: ३६७
- भरतीचा प्रकार: सरकारी नोकरी
शैक्षणिक पात्रता आणि पदांची माहिती
या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या आधारावर अर्ज करू शकतात.
- शैक्षणिक पात्रता:
- १०वी पास उमेदवार
- आयटीआय पदवीधर
- इंजिनियरिंग डिग्री प्राप्त केलेले उमेदवार
- पदांची नावे:
- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
- मोटार मेकॅनिक
- शिटमेटल वर्कर
- वेल्डर
- पेंटर
- डिझेल मेकॅनिक
- आणि इतर विविध पदे
अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अंतिम तारीख काय?
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे. तुम्हाला दिलेल्या वेबसाइटवर नोंदणी करून अर्ज भरावा लागेल.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (नोंदणी करून)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ ऑगस्ट २०२५
- अर्ज कसा करावा:
- सर्वात आधी http://www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे.
- यानंतर, अर्ज भरून एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक या पत्त्यावर जमा करायचा आहेत.
निष्कर्ष काय?
ही एक अशी सुवर्णसंधी आहे, जिथे तुम्हाला सरकारी विभागात काम करण्याचा अनुभव मिळेल. जर तुम्ही नुकतेच शिक्षण पूर्ण केले असेल आणि नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी सोडू नका. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.