बांधकाम कामगारांना 12,000 रुपये; तुम्ही पात्र आहात का? चेक करा Bandhkam Kamgar Yojana List

Bandhkam Kamgar Yojana List: राज्य सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहेत. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे (Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board) नोंदणी केलेल्या पात्र कामगारांसाठी आता पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा उद्देश कामगारांना उतारवयात आर्थिक स्थैर्य देणे हा आहे. सरकारने या संदर्भात १९ जून २०२५ रोजी एक नवीन शासन निर्णय (जीआर) जाहीर केलेला असून, त्यानुसार पात्र कामगारांच्या खात्यात पेन्शनची रक्कम थेट जमा केली जाणार आहेत.

Bandhkam Kamgar Yojana

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि पात्रता काय?

या योजनेअंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी व नियम ठरवण्यात आलेले आहेत:

लाडकी बहीण जुलै हफ्ता आला नाही; या 7 कारणांमुळे, पैसे आले नाही Ladki Bahin Yojana Hafta
लाडकी बहीण जुलै हफ्ता आला नाही; या 7 कारणांमुळे, पैसे आले नाही Ladki Bahin Yojana Hafta
  • पात्रता: पेन्शन मिळवण्यासाठी कामगाराचे वय ६० वर्षे पूर्ण झालेले असावे आणि तो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असावेत.
  • पती-पत्नीसाठी लाभ: या योजनेमध्ये एका घरातील पती आणि पत्नी दोघेही पात्र ठरल्यास त्यांना स्वतंत्रपणे पेन्शनचा लाभ मिळणार आहे.
  • मासिक रक्कम: प्रत्येक पात्र कामगाराला दरमहा पेन्शन मिळेल. एका व्यक्तीला कमाल ₹१२,००० पर्यंत लाभ मिळू शकतो. त्यामुळे, पती-पत्नी दोघेही पात्र ठरल्यास त्यांना एकत्रितपणे दरमहा ₹२४,००० पर्यंत पेन्शन मिळू शकतात.

नोंदणीनुसार पेन्शनची रक्कम किती?

या योजनेत पेन्शनची रक्कम कामगाराच्या मंडळाकडे केलेल्या नोंदणीच्या कालावधीवर अवलंबून आहे.

  • १० वर्षे नोंदणी: ज्या कामगारांची नोंदणी १० वर्षे पूर्ण झालेली आहे, त्यांना दरमहा ₹६,००० पेन्शन मिळणार आहे.
  • १५ वर्षे नोंदणी: ज्या कामगारांची नोंदणी १५ वर्षे पूर्ण झालेली आहे, त्यांना दरमहा ₹९,००० पेन्शन मिळणार आहेत.
  • २० वर्षे नोंदणी: ज्या कामगारांची नोंदणी २० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना दरमहा ₹१२,००० पेन्शन मिळणार आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे?

पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी सर्वप्रथम बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहेत. नोंदणीसाठी तुम्हाला खालील कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत:

उद्यापासून ‘या भागात’ अतिमुसळधार पाऊस होणार! IMD Rain Alert
उद्यापासून ‘या भागात’ अतिमुसळधार पाऊस होणार! IMD Rain Alert
  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. बँक पासबुकची झेरॉक्स
  4. मोबाईल नंबर
  5. वय आणि पत्त्याचा पुरावा

अधिक माहितीसाठी तुम्ही मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahabocw.in ला भेट देऊ शकतात. किंवा स्थानिक बांधकाम कामगार विभागाशी संपर्क साधू शकतात.

लाडक्या बहिणींना, १५०० ऐवजी २१०० रुपये कधी मिळणार? मोठी घोषणा पहा Ladki Bahin Yojana Installment

२६ लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार, तुम्ही पात्र कि अपात्र? यादी चेक करा Ladki Bahin Yojana
२६ लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार, तुम्ही पात्र कि अपात्र? यादी चेक करा Ladki Bahin Yojana Qualification Status

Leave a Comment