Gold Silver Price: आज देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच, सोन्याच्या बाजारातून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झालेली असून, यामुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदार दोघांमध्येही उत्सुकता वाढलेली आहे. जागतिक घडामोडी आणि भारतीय बाजारातील वाढलेली मागणी यामुळे सोन्याचे भाव पुन्हा एकदा उच्च पातळीवर पोहोचले आहे.
Gold Silver Price
आज सोन्याच्या दरात ₹७०० ची वाढ
कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम तब्बल ₹७०० ची वाढ झालेली आहे. यामुळे, आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव लक्षणीयरीत्या वाढले आहे. सणासुदीच्या दिवसांत सोन्याची खरेदी करण्याची प्रथा असल्याने या दरवाढीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
आजचे सोन्याचे दर (९ ऑगस्ट २०२५)
सोन्याचा प्रकार | आजचा दर (प्रति १० ग्रॅम) |
२२ कॅरेट सोनं | ₹९४,७१० |
२४ कॅरेट सोनं | ₹१,०३,३२० |
टीप: हे दर मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव आणि ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये सारखेच आहे.
सोन्याच्या दरवाढीची कारणे काय?
सोन्याच्या दरातील या वाढीमागे अनेक जागतिक आणि स्थानिक कारणे आहे. अमेरिका आणि युरोपमधील व्याजदर धोरणांमधील संभाव्य बदल, तसेच आशियाई बाजारातील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहे. जागतिक बाजारातील अशा घडामोडींचा भारतीय सोन्याच्या दरांवर थेट परिणाम दिसून येत आहेत.
गुंतवणूकदारांसाठी सल्ला काय?
सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढणे स्वाभाविक आहेत. मात्र, तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या बाजारस्थितीत गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. दररोजच्या बदलांवर लक्ष ठेवूनच गुंतवणुकीचा निर्णय घेणे योग्य ठरेल. लक्षात ठेवा, सोन्याची खरेदी ही केवळ गुंतवणूक नसून, अनेकदा भावनिक मूल्य जपण्याचा एक भाग असतेय.