Ladki Bahin Yojana Hafta: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. शासनाने जून महिन्याचा १२वा हप्ता जारी केला असून बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. मात्र, अद्याप अनेक महिलांना हा हप्ता मिळालेला नाहीत, ज्यामुळे त्यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. यामागे काही विशिष्ट कारणे असू शकतात, ज्यांची पडताळणी करणे आवश्यक आहेत.
जून महिन्याचा हप्ता न मिळण्याची ७ प्रमुख कारणे कोणती?
तुमचा जून महिन्याचा हप्ता जमा न होण्यामागे योजनेच्या काही कठोर निकषांचे पालन न करणे हे प्रमुख कारण असू शकते. खालीलपैकी एखादे कारण तुमच्या बाबतीत लागू होत आहे का? याची तपासणी करावी:
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरत नाहीथ.
- आयकर भरणारे सदस्य: कुटुंबातील कोणताही सदस्य नियमितपणे आयकर भरत असल्यास, त्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळत नाहीथ.
- सरकारी नोकरी: जर कुटुंबातील एखादी व्यक्ती राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागात किंवा उपमंडळात नोकरी करत असेल, तर तुम्ही अपात्र ठरता.
- इतर योजनांतून लाभ: जर तुम्हाला सरकारच्या इतर कोणत्याही योजनेतून दरमहा ₹१५०० पेक्षा जास्त आर्थिक मदत मिळत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही.
- राजकीय पद: कुटुंबातील सदस्य सध्याचे किंवा माजी आमदार (MLA) किंवा खासदार (MP) असल्यास, तुम्ही योजनेसाठी अपात्र ठरता.
- शासकीय मंडळाचे सदस्यत्व: कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही महामंडळ, बोर्ड किंवा उपमंडळाचा भाग असल्यास लाभ मिळणार नाही.
- चारचाकी वाहन: कुटुंबाच्या नावावर ट्रॅक्टर वगळून कोणतेही चारचाकी वाहन (उदा. कार, जीप) असल्यास, तुम्ही अपात्र ठरता.
हप्ता न मिळाल्यास पुढील पाऊल काय?
जर तुम्हाला अजूनही जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल आणि तुम्हाला खात्री आहे की तुम्ही वरीलपैकी कोणत्याही निकषात बसत नाही, तर तुम्हाला तातडीने पुढील कारवाई करणे आवश्यक आहे.
- पात्रता तपासा: सर्वप्रथम, तुमच्या अर्जाची स्थिती आणि तुमची पात्रता पुन्हा एकदा तपासा.
- स्थानिक कार्यालयाशी संपर्क: या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा मदतीसाठी तुम्ही तुमच्या स्थानिक महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधावा. ते तुमच्या अर्जाची सविस्तर माहिती देऊन योग्य मार्गदर्शन करू शकतील