Ladki Bahin Yojana Qualification Status : महायुती सरकारने सुरू केलेली आणि अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आहेत. या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आल्यानंतर आता तब्बल २६ लाख महिलांची गृह चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहेत. महिला व बालविकास विभागाने ही चौकशी सुरू केली असून, त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे.
२६ लाख महिलांची चौकशी का?
योजनेच्या नियमांनुसार, एका घरात दोनपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र, अशी माहिती समोर आली आहेत की, अनेक घरांमध्ये दोनपेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळत आहेत. याच नियमाचे उल्लंघन झाल्याचे समोर आल्यामुळे, महिला व बालविकास विभागाने अशा २६ लाख महिलांची यादी तयार केलेली आहे. आता विभागानुसार या सर्व महिलांची गृह चौकशी केली जात आहेत. चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या महिलांचे नाव योजनेतून वगळले जाईल. सध्या २ कोटी २९ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, या चौकशीनंतर अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात
दुसरीकडे, या चौकशीच्या ससेमिरा सुरू असतानाच, सरकारने पात्र महिलांना मोठा दिलासा दिलेला आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा हप्ता थेट जमा होत असून, उर्वरित लाभार्थ्यांनाही रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येपर्यंत पैसे मिळतील. या निर्णयामुळे नाराज झालेल्या महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहेत.
लाडकी बहीण योजना: पात्रता निकष
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहेत:
- वयाची अट: अर्ज करणाऱ्या महिलेचे वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.
- उत्पन्नाची मर्यादा: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबातील लाभार्थी संख्या: एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
- वाहन: कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता कोणतेही चारचाकी वाहन नसावे.
- शासकीय नोकरी/पेन्शन: अर्जदार महिला किंवा तिच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत किंवा पेन्शनधारक नसावे.
- इतर सरकारी योजना: अर्जदार महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेतून मासिक आर्थिक लाभ घेत नसावी.