Maharashtra School New Announcement : राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकाच वेळी तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या निर्णयांची घोषणा केली असून, त्यांचा थेट परिणाम राज्यातील सर्व शाळांवर होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रगीतानंतर आता ‘राज्यगीत’ अनिवार्य
राज्य शासनाने आता महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्याचे गौरवशाली गीत, ‘गर्जा महाराष्ट्र माझा’, गाणे बंधनकारक केलेले आहे. मराठी माध्यमांच्या शाळा असोत किंवा कोणत्याही अन्य माध्यमांच्या, यापुढे प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतासोबत राज्यगीत म्हणणे अनिवार्य असणार आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही शिक्षण विभागाने दिलेला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये मोठा बदल!
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा या उद्देशाने शिष्यवृत्ती परीक्षेबाबतही एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहेत.
- या वर्षी: सध्या, चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी या चार वर्गांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाणार आहे.
- पुढील वर्षापासून: यापुढे, ही परीक्षा फक्त चौथी आणि सातवी या दोनच वर्गांसाठी घेण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, अशी सरकारला आशा आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा सरकारी शाळांकडे कल वाढण्यासही मदत होणार आहे.
लवकरच शालेय विद्यार्थ्यांना मिळणार हेल्थ कार्ड
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिक्षण विभागाने आणखी एक पाऊल उचलले आहेत. यापुढे, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. तपासणीनंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक विशेष ‘हेल्थ कार्ड’ दिले जाईल, ज्यात त्याच्या आरोग्याची सर्व माहिती नोंदवलेली असेल. यापूर्वी आरोग्य तपासणी फक्त एक औपचारिकता म्हणून पाहिली जात होती, मात्र आता हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अधिक गांभीर्याने घेण्यात आला आहेत.
हे तीनही निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या आरोग्य आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी महत्त्वाचे ठरतील.